नागठाणे – अपशिंगे (मिलिटरी) येथून विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सौ. तनुजा सतीश डांगे (वय 24) असे बेपत्ता विवाहितेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती की, सोमवारी रात्री राहत्या घरातून सौ. तनुजा डांगे या कोणास काही न सांगता निघून गेल्या. याची फिर्याद सतीश रामचंद्र डांगे यांनी दिली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार बी. आर. यादव करत आहेत.