आता लग्नखर्चाचा हिशेब द्यावा लागणार? (भाग-२)

हुंड्याविषयीच्या एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सरकारला निर्देश दिले की कुटुंबांनी लग्नासाठी झालेल्या खर्चाचा खुलासा करणे अनिवार्य करण्याविषयी विचार करावा आणि त्याविषयी लवकरच नियमही तयार करावा. विवाहाशी निगडित एका वादाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला हा सल्ला दिला आहे. सरकारने जर असा कायदा बनवला तर हुंडाबळीच्या प्रकरणांमध्ये खूप कमतरता येईल असा त्यामागे तर्क आहे.

आता लग्नखर्चाचा हिशेब द्यावा लागणार? (भाग-१)

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, जर लग्नामध्ये दोन्ही पक्षांनी केलेल्या खर्चाचा हिशेब नोंदवलेला असेल तर हुंड्यासाठी छळप्रकरणी दाखल केलेल्या खटल्यांमध्ये धनाशी निगडित वाद सोडवण्यास मदत मिळेल. त्यामुळे हुंडा देणे-घेणे या पद्धतीला लगाम लावता येईल तसेच हुंड्याबळी कायद्यांतर्गत दाखल करण्यात येणाऱ्या खोट्या तक्रारींमध्येही कमतरता येईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्वोच्च न्यायालयाच्या या सल्ल्याचा उद्देश हुंड्याची प्रथा थांबवणे आणि हुंडाबळीच्या कायद्यांतर्गत दाखले केल्या जाणाऱ्या खोट्या तक्रारींवर नजर ठेवणे. हुंड्यासारख्या कुप्रथांवर लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला नक्कीच उत्तम आहे. त्यामुळे हुंड्यासाठी छळाच्या प्रकरणांमध्ये उल्लेखनीय घट होईल. जर केंद्राने सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मानला तर वधू आणि वर दोन्ही पक्षांना लग्नाच्या खर्चाचा तपशील सरकारला देणे अनिवार्य होईल. याविषयी असेही म्हणता येईल की, खर्चाच्या हिशेबावर वर आणि वधू दोन्ही पक्षांच्या व्यक्तींची सही असावी जेणेकरून नंतर वाद उत्पन्न झाल्यास कोणताही पक्ष नकार देऊ शकणार नाही. आणि जास्त खर्च किंवा जास्त हुंडा मागितल्याचा दावाही करू शकणार नाही.

त्याचबरोबर जर एखादा पक्ष आपल्या दोन नंबरच्या अर्थात काळ्या पैशाचा वापर लग्नकार्यासाठी करत असले आणि खर्चाचा तपशील देताना कमी दिला असेल तर नंतर वाद झाल्यास पूर्ण खर्चाविषयी दावा करू शकत नाही आणि मिळेल तोच खर्च घेऊन संतुष्ट राहावे लागेल. सरकारने जर असा कायदा बनवला तर हुंडाबळीच्या प्रकरणांमध्ये खूप कमतरता येईल. त्यामुळे न्यायालयाच्या सूचनेनुसार केंद्र सरकार याला कायद्याचे स्वरुप देईल तितके भारतीय समाजासाठी ते उपयुक्त ठरेल.

– विनायक सरदेसाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)