लग्नासाठी बचतीचे काही सरस पर्याय (भाग-१)

इक्विटी अथवा इक्विटी म्युच्युअल फंडात सातत्याने गुंतवणूक करा, जसे आपण सणसमारंभाला सोने खरेदी करतो. त्यातून लग्नसमारंभांसारख्या मोठ्या खर्चाचे उत्तम नियोजन होऊ शकते.

सध्या मुलामुलींच्या लग्नासाठी डेस्टिनेशन वेडिंग म्हणजेच एखाद्या सुंदर थंड हवेच्या ठिकाणी अथवा परदेशात लग्नसमारंभ करणे. अशा संकल्पना आता वेगाने पुढे येत आहेत आणि या प्रकारच्या लग्नसमारंभासाठी मोठ्या पैशांची सोय करणे व त्याची पूर्वतयारी अगदी मूल जन्मल्यापासून करणे पालकांना आवश्यक आहे. अशी संकल्पना पूर्ततेला नेण्यासाठी आर्थिक नियोजन शिस्तबद्ध गुंतवणूकीद्वारे करता येऊ शकते.

भारतीय संस्कृती लग्न हा एक मोठा सोहळा असतो व त्यावर होणारा खर्च हादेखील मोठा असतो. लग्नखर्चात प्रामुख्याने सोनेखरेदीसाठी महत्त्वाचा खर्च होतो. बहुतांशी घरी मुलीच्या लग्नासाठी सातत्याने सोन्याची खरेदी दागिने स्वरुपात अथवा सोन्याचे वळे अथवा नाणे वेगवेगळ्या सणांना किंवा वाढदिवसाला खरेदी केले जात असतात. स्त्रीधन म्हणून आपल्या मुलीसाठी सोने जमा करणे हे बहुतांशी पालक शिस्तबद्ध पद्धतीने करत असतात. सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिली जाते. दीर्घकालीन लग्नाच्या उद्दीष्टासाठी सोन्याच्या दरात वाढच होईल या विचाराने याठिकाणी गुंतवणूक होत असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्यक्ष सोने खरेदी ऐवजी कागदावर सोने खरेदी करा.

सोने खरेदीसाठी गुंतवणूक करणे ही चांगली सवय आहे. परंतु यातील दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे प्रत्यक्ष सोने खरेदी करण्यापेक्षा सोन्याच्या एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) यामध्ये गुंतवणूक करणे जादा फायद्याचे आहे. सरकारी सोन्यांच्या रोख्यांमध्येही गुंतवणूक करता येते आणि अशा गुंतवणुकीवर गुंतवणूकदारास खरेदी व विक्री करताना कोणतेही जादाचे शुल्क लागत नाही अथवा खर्च येत नाही. असे शुल्क किंवा खर्च प्रत्यक्ष सोने खरेदी करताना द्यावा लागतो.

सोन्याचे सरकारी रोखे वार्षिक 2.5 टक्के व्याज (दर सहामाही पद्धतीने ) देत असतात. अशा गुंतवणुकीत सोन्याच्या शुद्धतेची काळजी व चोरीची भीती बिलकुल नसते.

लग्नाच्या मोठ्या खर्चाची जमवाजमव म्युच्युअल फंडातील योजनांमध्ये गुंतवणूक करून उभी करू शकता.

इक्विटीतील गुंतवणूक ही नेहमीच दीर्घकालीन संपत्ती निर्माण करत असते. परंतु थेट शेअरबाजारात शेअरची खरेदी करणे प्रत्येक गुंतवणूकदारास शक्यक होत नाही. त्याची अनेक कारणे असू शकतात. अशावेळी तज्ञ गुंतवणूक फंड मॅनेजर्स त्यांच्या देखरेखीखाली म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये संपत्ती निर्माण करत असतात. हा सर्वसामान्य गुंतवणूकदारासाठी पैसा जमवण्याचा उत्तम राजमार्ग आहे.

लग्नासाठी बचतीचे काही सरस पर्याय (भाग-२)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)