लग्नासाठी बचतीचे काही सरस पर्याय (भाग-२)

इक्विटी अथवा इक्विटी म्युच्युअल फंडात सातत्याने गुंतवणूक करा, जसे आपण सणसमारंभाला सोने खरेदी करतो. त्यातून लग्नसमारंभांसारख्या मोठ्या खर्चाचे उत्तम नियोजन होऊ शकते.

लग्नासाठी बचतीचे काही सरस पर्याय (भाग-१)

मुलीच्या लग्नासाठी फार मोठ्या रकमेची जमवाजमव करावी लागते. सोनेखरेदी, डेस्टिनेशन वेडिंग, कापड खरेदी इत्यादी बाबींवर मोठा पैसा खर्च होत असतो. यासाठी पैशाचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. मागील इतिहास पाहता गुंतवणकदारांना म्युच्युअल फंडांच्या योजनेतून मोठा पैसा उभा करता आला आहे. म्युच्युअल फंडात अनेक योजनांनी दीर्घकालीन संपत्ती निर्माण केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्यक्ष शेअरबाजारात इंडेक्स योजनांमध्ये जरी गुंतवणूक केली असली तरी 1979 रोजी गुंतवलेल्या रू. 100 ची आजची किंमत 36,800 झाली आहे. म्हणजेच सदर गुंतवणूक दरसाल चक्रवाढ व्याजाने 16 टक्क्यांचा परतावा देत आली आहे. गुंतवणूकदाराची संपत्ती याच काळात 368 पट वाढली आहे. जर सदर गुंतवणूक म्युच्युअल फंडाच्या चांगल्या योजनेमध्ये केली असती तर गुंतवणुकीची वाढ अनेक पटीने वाढली असती.

प्रत्येक सणांमध्ये तसेच मुलीच्या वाढदिवसाला म्युच्युअल फंडातील योजनेमध्ये सोनेखरेदी ऐवजी गुंतवणूक करावी. ज्याप्रमाणे सोन्याचे दर आपण दररोज तपासत नाही त्याचप्रमाणे अशा गुंतवणुकीतील बदल रोज तपासण्याची आवश्यसकता नसते. ज्याप्रमाणे सोन्याच्या दरात घट झाल्यास बहुतांशी पालक वाढीव सोने खरेदी करतात त्याचप्रमाणे शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यास म्युच्युअल फंड योजनांमध्ये आपली गुंतवणूक वाढवावी. मुलींची लग्ने हे दीर्घकालीन उद्दीष्ट आहे. त्यामुळे या उद्दीष्टपूर्तीसाठी सातत्यपूर्ण शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक योग्य म्युच्युअल फंड योजनेत करणे आवश्यक आहे. आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीने योजनेची निवड करून दीर्घकालीन गुंतवणूक योजना तयार केल्यास आपल्या लाडक्याम मुलांची लग्ने धुमधडाक्याीत करणे सहज शक्य होते.

सोनेरी सल्ला

ज्याप्रमाणे सोने खरेदी केल्यास दररोज त्याचा भाव अथवा दर पाहत नाही तसेच शेअर अथवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास दररोज भाव पाहू नका, जर शेअर बाजारात मोठी घसरण झाली तर निश्चिातपणे आपली गुंतवणूक वाढवा.
मुलांच्या लग्नासाठी मोठी रक्कम उभी करताना, मुलांच्या जन्मतःच म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये एसआयपी सुरु करा व दर वाढदिवसाला त्यामध्ये वाढीव रकमेची भर घाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)