बारामती – पाहुणेवाडी येथे विवाहितेचा गेल्या 10 वर्षांपासून माहेरून पैसे घेऊन येण्यासाठी वेळोवेळी पती व सासू-सासऱ्याकडून शारीरिक, मानसिक छळ, काठीने मारहाण तसेच तिच्यासह मुलीला घराच्या बाहेर काढले होते. याप्रकरणी कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती कमलाकर सदाशिव माने, सासरे सदाशिव धोंडीराम माने, सासू बेबी सदाशिव माने असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर अनुराधा कमलाकर माने (वय 35) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 2009 पासून ते शनिवार (दि. 1) अखेरपर्यंत अनुराध माने यांना पती, सासू-सासरे वेळोवेळी विविध कारणांवरुन त्रास देत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.