हुंड्यासाठी झालेल्या मारहाणीत विवाहितेचा मृत्यू

पिंपरी – माहेरहून 20 हजार रुपये हुंडा आणत नसल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला अमानुष मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवार (दि.12) भोसरी एमआयडीसीतील गवळीमाथा येथे घडली.

या घटनेत किरण रमेश यादव (वय 21, रा. गवळी माथा, टेल्कोरोड, एमआयडीसी, भोसरी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी शत्रुघ्न सीतलाप्रसाद यादव (वय 55, रा.पचारी खुर्द, पो. बितेहरा, ता. उदवली, जि.बस्ती, उत्तर प्रदेश) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती रमेश चंद्रबली यादव (वय 27, रा. गवळी माथा, टेल्कोरोड, एमआयडीसी भोसरी) याला अटक केली आहे.

पोलीस उपनिरीक्षक रूपाली पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2017 मध्ये किरण हिचा रमेश सोबत विवाह झाला होता. किरण हिने माहेरहून 20 हजार रुपये आणावेत, यासाठी आरोपी पती रमेश तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. शुक्रवारी आरोपीने केलेल्या मारहाणीत किरणचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी पती रमेश याला अटक केली आहे. तसेच, डॉक्‍टरांच्या अहवालानंतरच मृत्यूचे कारण समोर येईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)