विवाहविम्याच्या अंतरंगात… (भाग-१)

आयुष्यात लग्न एकदाच होते. त्यामुळे लग्नसोहळा संस्मरणीय राहावा यासाठी मुला-मुलीचे आई-वडील प्रचंड मेहनत घेतात. विवाह सोहळ्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता राहणार नाही, याबाबत पालक मंडळी सजग राहतात. मात्र दुर्देवाने काही अप्रिय घटनेमुळे विवाह सोहळ्यात अडचणी येण्याचे प्रसंग घडतात. उन्हाळ्यात होणारे शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणांनी आग लागणे, चोरी, वादळ, पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे विवाह सोहळ्याला बाधा येण्याची शक्‍यता असते. अशा घटनांमुळे मानसिक धक्‍का बसतोच त्याचबरोबर आर्थिक नुकसानही बरेच सहन करावे लागते. त्यामुळे वेडिंग इन्शूरन्स (विवाहाचा विमा) या हानीपासून बचाव करू शकतो.

जीवनातील महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या क्षणाची सुरक्षा ठेवण्यासाठी वेडिंग इन्शूरन्सचे कवच उपयुक्त ठरू शकते. गेल्या काही वर्षांपासून भारतात विवाह विमा उतरवला जात आहे. इव्हेंट मॅनेजर, केटरर्स, गेस्टहाऊस संचालकापासून डिझायनर आणि अन्य महागडे कपडे यांचा विम्यात समावेश करता येतो.

विम्याचा कमी हप्ता : विमा कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या वेडिंग इन्शूरन्सची व्याप्ती मोठी आहे. हप्त्यानुसार विमा कवच अवलंबून आहे. जर लग्न हॉटेलमध्ये होत असेल तर ज्वेलरी आणि अन्य महागड्या वस्तूंचा विमा उतरवणे गरजेचे आहे. विवाह सोहळा भव्यदिव्य असेल तर वेडिंग इन्शूरन्सचा हप्ता हा एकूण खर्चाच्या एक टक्के असतो. उदा. आपण विवाहासाठी 20 लाखाचा विमा उतरवला तर त्याचा हप्ता हा साधारणत: 20 हजार रुपयाच्या आसपास राहतो. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या सोहळ्यासाठी ही रक्‍कम फारशी नाही. जर आपण क्रुझवर विवाह करत असाल तर वधू-वराबरोबरच विवाह सोहळ्यात सामील होणाऱ्या वऱ्हाडींना सुरक्षा कवचही घ्यावे लागते. त्याची जोखीम विमा कंपनी उचलते.

दुर्देवी घटनेपासून बचाव : विवाह सोहळ्यात होणारा खर्च हा लाख, कोटीच्या घरात असतो. जर जोखमीच्या ठिकाणी विवाह सोहळा होत असेल तर विमा उतरवणे गरजेचे आहे. विवाहाच्या काळात एखादी अप्रिय घटना घडली तर आपल्याला नुकसान भरपाई मिळते. एखाद्या कारणामुळे विवाहाची तारीख पुढे ढकलली असेल किंवा रद्द झाला असेल तर विम्यासाठी आपण दावा करू शकतो. जर एखाद्या व्यक्तीने अगोदरपासूनच व्यक्तिगत विमा, आरागेय विमा किंवा घराचा विमा उतरवला असेल तर त्याला वेडिंग इन्शूरन्स घेण्याची गरज नाही.

विवाहविम्याच्या अंतरंगात… (भाग-२)

कागदपत्रे सांभाळून ठेवा : वेडिंग इन्शूरन्स उतरवण्यासाठी दागिने, केटरिंग, मंडप यासह अन्य खर्चाचे पक्के बिल सांभाळून ठेवावे. आपण वेडिंग इन्शूरन्सचा विचार करत असाल तर सर्व खर्चाचे बिल सोबत असावे. बिलाशिवाय आपण दावा करू शकत नाही आणि भरपाईपासून वंचित राहू शकतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.