“मरे एक त्याचा’ नाटकाने पटकाविला प्रथम क्रमांक

पिंपरी -महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पिंपरी-चिंचवड केंद्रातून “आमचे आम्ही’ (पुणे) या संस्थेच्या “मरे एक त्याचा’ या नाटकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तर, संक्रमण (पुणे) या संस्थेने सादर केलेल्या “आपुलाचि वाद आपणासी’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली आहे.

उद्‌गार (पुणे) या संस्थेने सादर केलेल्या “फडस’ या नाटकाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात 15 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान अतिशय जल्लोषात ही स्पर्धा पार पडली. या 59 व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेत एकूण 22 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले.

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रकाश जोशी, प्रतिभा पाटील आणि सुरेश खानविलकर यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.

स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे
(प्रथम, द्वितीय या क्रमाने) : दिग्दर्शन – प्रणव जोशी (नाटक – मरे एक त्याचा), यतिन माझिरे (आपुलाचि वाद आपणासी). प्रकाश योजना : वैभव नवसकर (आपुलाचि वाद आपणासी), गिरीश कर्पे (काटकोन त्रिकोण), नेपथ्य : सुनिल डोंगर (फडस), सिद्धेश नेवस (आपुलाचि वाद आपणासी), रंगभूषा : मनोहर जुवाटकर (पोंगा पंडित), शिवप्रसाद पासलकर (बाली वध).

उत्कृष्ट अभिनय (रौप्य पदक) – नेहा नाईक (मरे एक त्याचा) व अनिरूद्ध पारखी (अचानक). अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे – श्रद्धा पोखरणकर (मरे एक त्याचा), उन्नती कांबळे व ज्ञानेश्‍वर विधाते (फडस), शितल ईनामदार (दाह), शुभांगी जाधव व अक्षरकुमार मांडे (अ सायकीयाट्रीस्ट), रेखा ठाकूर (काटकोन त्रिकोण), विजय वाळे (द रिटर्न गिफ्ट), अनिकेत भोसले (पोंगा पंडित), यतीन माझिरे (आपुलाचि वाद आपणासी).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.