मार्केटयार्ड सोमवारी बंद

आडते असोसिएशन, कामगार युनियनचा निर्णय; मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा

पुणे – मराठा समाजाच्या राज्यव्यापी आंदोलनाला मार्केटयार्ड येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशन आणि कामगार युनियनने पाठिंबा दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मराठा आरक्षण मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दोन्ही संघटनांकडून येत्या सोमवारी (दि.30) बंदचे आवाहन केल्याची माहिती आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, कामगार युनियनचे अध्यक्ष अमोल चव्हाण आणि सचिव संतोष नांगरे यांनी दिली. दरम्यान, मालवाहतूकदारांचा देशव्यापी संप सुरू आहे. या संपाला पाठिंबा असल्याचेही दोन्ही संघटनांकडून कळविण्यात आले आहे.

मराठा आंदोलन सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर गुरूवारी आडते असोसिएशनच्या वतीने बैठक बोलविण्यात आली. विलास भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस मराठा आंदोलनास एकमताने पाठिंबा देण्यात आला. सोमवारी मार्केट यार्डातील तरकारी, फळे, कांदा-बटाटा आणि केळी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर कामगार युनियनही बंदात सहभागी होणार आहे. कामगार युनियनचे अध्यक्ष अमोल चव्हाण, सचिव संतोष नांगरे यांनी याबाबतची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)