आज मार्केटयार्ड बंद

पुणे – माथाडी कायद्याला 5 जून 2019 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मंगळवारी (दि.4) मार्केटयार्ड बंदचे आवाहन श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियनचे अध्यक्ष विलास थोपटे यांनी केले आहे. दरम्यान, या बंदमध्ये आडते सहभागी होणार असल्याचे आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले.

ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत बंदचा निर्णय घेण्यात आला. या कायद्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. देशात आता अंगमेहनती कष्टकऱ्यांची संख्या 50 कोटींपर्यंत पोहोचली आहे. ज्यांना कोणत्याही कामगार कायद्याचे संरक्षण नाही. त्यांच्यासाठी हा कायदा उपयुक्‍त आहे. या कायद्यामुळे सरकारच्या तिजोरीवर भार न पडता कष्टकऱ्यांना ओळखपत्र, भविष्य निर्वाह निधी, उपदान, रजेचा पगार, नुकसान भरपाई कायदा आणि वैद्यकीय मदत आदी सुविधा उपलब्ध होतात. 5 जानेवारी रोजी रमजान ईद आहे. सुट्टी असल्याने 4 जून रोजी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी, प्रांत आणि तहसीलदार कार्यालय येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे थोपटे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.