फुरसुंगी – भारत बंदला फुरसुंगी तसेच कोंढवा परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी नगरसेवक गणेश ढोरे यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देत शेतकरीविरोधी कायदा रद्द करण्याची मागणी केली.
आंदोलनात फुरसुंगीसह भेकराईनगर, उरूळी देवाची, वडाचीवाडी, हांडेवाडी, होळकरवाडी, वडकी, पिसोळी, उंड्री, कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, सासवड रस्ता, मंतरवाडी बाह्यवळण मार्ग आदी भागातील दुकाने बाजारपेठा बंद होत्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अर्चना कामठे, पंचायत समिती सदस्य दिनकर हरपळे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कामठे, माजी पंचायत समिती सदस्य रोहिणी राऊत, माजी उपसरपंच भाऊसाहेब ढमाळ, संतोष पवार, सुहास खुटवड, नीता भाडळे, तात्यासाहेब भाडळे, सोमनाथ यादव, हनुमंत यादव, चंद्रकांत ढमाळ, शौकत शेख, रमेश निवंगुणे आदी उपस्थित होते.