पुणे/मार्केटयार्ड – दिवाळीनिमित्त मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना फराळ व बासमती तांदळाचे वाटप संचेती ट्रस्टतर्फे करण्यात आले, ट्रस्टचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले.
स्व. इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टच्यावतीने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना दिवाळी फराळ व बासमती तांदूळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक अभय संचेती यांनी केले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र कॉंग्रेसचे सरचीटणीस अभय छाजेड, मार्केट कमिटीचे प्रशासक मधुकांत गरड, चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, मार्केट यार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेकानंद वाखारे उपस्थित होते.
प्रशासक मधुकांत गरड यांनी सांगितले की, संचेती ट्रस्टचे कार्य नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. ते नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात. या कार्यामुळे अनेक सामाजिक संस्थेना प्रेरणा मिळते. अभय छाजेड यांनी सांगितले की, अभय संचेती यांनी नेहमीच आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून पोलीस, आरोग्य कर्मचारी, हमाल बांधव तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत केली आहे, त्याचे ही अविरत सेवा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. यावेळी मनीष संचेती, विजय शिंगवी, सुभाष पगारिया, सतीश श्रीश्रीमाळ, सुरेश वानगोता, विकास सांवत, सुर्यकांत झेंडे, आयुब शेख उपस्थिती होते.
पुणे शहर व्यापारासाठी सुरक्षीत शहर म्हणून ओळखले जाते ते फक्त आपल्या पोलीस बांधवाच्या कर्त्यव्य निष्ठेमुळे. करोना काळात देखील मार्केट यार्डातील व्यापार व्यवस्थेत चालण्यामध्ये पोलीस बांधवाचा सिहाचा वाटा आहे. समाजासाठी सतत कार्यरत राहणाऱ्या पोलीस बांधवांची दिवाळीही गोड व्हावी, या भावनेतून सदर उपक्रम राबविण्यात आला.
– अभय संचेती, उद्योजक