बाजरसमिती, उपबाजार शुक्रवारी, शनिवारी बंद

राजगुरूनगर – खेड तालुक्‍यात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे करोनाची ही साखळी तोडण्यासाठी शुक्रवारी (दि. 19) व शनिवारी (दि. 19) “जनता कर्फ्यू’ होणार आहे. यामुळे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजगुरूनगर, चाकण मुख्य बाजारासह उपबाजार शेलपिंपळगावमधील सर्व दैनंदिन व्यवहार बंद शुक्रवारी व शनिवारी बंद ठेवण्यात येणार आहे. भाजीपाला तरकारी, कांदा बटाटा, आणि शनिवारी भरणारा शेळ्या मेंढ्या व जनावरांचा बाजार या दोन दिवशी बंद राहणार आहे.

 

दरम्यान, चाकण येथील शनिवारी भरणारा जनावरांचा व तरकारीचा बाजार रविवारी (दि. 20) भरणार असल्याची माहिती बाजार खेड कृषी उत्पन्न बाजार समीतिचे सभापती विनायक घुमटकर सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली. शेतकरी आडते, व्यापारी हमाल मापाडी यांनी याबाबतची नोंद घ्यावी. करोना विषाणू संसर्ग साखळी रोखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेत घरी थांबून सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.