श्रीगोंदा (प्रतिनिधी) – बाजार समितीचे संचालक लक्ष्मण नलगे यांचे धाकटे सुपुत्र दादासाहेब लक्ष्मण नलगे (वय 37) यांनी आज दौंड (जि.पुणे) येथे स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
याबाबत माहिती अशी की, नलगे हे कुटुंबीयांसह दौंड (जि. पुणे) शहरातील पोलीस उपअधीक्षक कार्यालयाशेजारील तारामोती अपार्टमेंटमधील सदनिकेत वास्तव्य आहे.
याच सदनिकेत आज (दि.2) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दादासाहेब नलगे यांनी शयनकक्षात स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दौंड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हृषीकेश अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.