तळेगाव दाभाडे – किरकोळ वादातून विवाहित तरुणीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तळेगाव दाभाडे येथील आनंदनगर परिसरात सोमवारी (दि. 6) पहाटे एकच्या सुमारास ही घटना घडली. अंबिका श्रीरंग भालेकर (वय 21, रा. आनंदनगर, तळेगाव दाभाडे ता. मावळ) असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबिका भालेकर यांचे घरात वाद झाले. या रागातून तिने राहते घरी दोरीच्या सहायाने गळफास लावून आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे तपास करीत आहेत.