पुणे, दि. 7 (प्रतिनिधी) – जनशक्ती विकास संघ सामाजिक संस्थेच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सारिका भिसे-खान यांना “मर्दानी महाराष्ट्रा’ची पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जालनाचे भूमी विकासचे आयुक्त डी. एल. घोडके, कौशल्य विकास रोजगार उद्योजकच्या उपायुक्त अनूपमा पवार, सहायक पोलीस आयुक्त आर. एन. राजे, सहायक आयुक्त वैभव कडलक यांच्या उपस्थित होते.
करोना काळात सारिका यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यावेळी त्यांनी मोफत करोना तपासणी, गरजू, कष्टकरी लोकांना मोफत भोजन, ससून हॉस्पिटल परिसरात उपक्रम, झोपडपट्टी भागात अन्न धान्यांचे किट आदी उपक्रम राबविले होते. यावेळी विविध क्षेत्रातील 75 महिलांना गौरविण्यात आले. यावेळी मुंबईचे सहायक पोलीस आयुक्त सुरेखा कपिले, सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, संगीत दिग्दर्शक हुमायून कबीर, संघटनेच्या शहर उपाध्यक्षा शिरीन शेख, कार्याध्यक्ष सीमा दांडगे, महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.