Marathwada Rain । राज्यभरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. मराठवाड्यात पावसाचा तांडव सुरु आहे. त्यात हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाने पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. याठिकाणी पूरपरिस्थिती ओढावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दरम्यान, हवामानशास्त्र विभागानं आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच मराठवाड्याला आणखी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, मागील ६ तासांत अरबी समुद्रावर असणारा कमी दाबाचा पट्टा आता नैऋत्येकडे सरकला आहे. त्यामुळं विदर्भासह मराठवाड्यावर पुढील १२ तास कमी दाब राहणार असून आणखी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट Marathwada Rain ।
त्यासोबतच आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे. रविवारी रात्रीपासून जिल्ह्यात तुफान पाऊस होत असून आज सकाळपासून पावसाचा जोर वाढलेलाच आहे. धरण परिसरात मुसळधार पाऊस झाल्यानं जायकवाडी धरण भरलं आहे.
‘या’ जिल्ह्यांला पावसाचा अलर्ट Marathwada Rain ।
हवामान विभागानं जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला असून छत्रपती संभाजीनगरला पावसाला ऑरेंज अलर्ट दिलाय. यावेळी वादळी वाऱ्यांसह व वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करणाचे आदेश
दरम्यान, सुरु असणाऱ्या पावसाचा जोर ओसरल्यावर पंचनामे करण्याचे आदेश धनंजय मुंडे यांनी दिलेत. नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला मर्यादेत कळवावी, असेही आवाहन धनंजय मुंडे यांनी केलंय. पावसाचा जोर कमी होताच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिले आहेत.