मुंबई – मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये फैशन ‘क्विन’ च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री ‘प्रिया बापट’ने अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. तिने आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच घर निर्माण केलं आहे. सध्या चित्रपटांसोबत प्रिया वेब सिरीजमध्येही दिसत आहे.
View this post on Instagram
“सिटी ऑफ ड्रिम्स’ या वेब सिरीजमध्ये प्रियाने लेस्बियन महिलेची भूमिका केली. या सिरीजमध्ये तिचा एक किसिंग सिन होता. त्यावेळी या सिनची बरीच चर्चा झाली होती. एखादी मराठमोळी अभिनेत्री सहसा बोल्ड समजल्या जाणाऱ्या वेब सिरिजच्या पॅटर्नमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे म्हटल्यावर आपल्या भोवया जरा उंचावल्याच. त्यात जर ती अभिनेत्री प्रिया बापट सारखी असेलतर अनेक चर्चा रंगू लागतात.
View this post on Instagram
मात्र, आता प्रिया बापट पुन्हा एकदा अशाच प्रकारची भूमिका निभावणार आहे. “फादर लाईक’ या आपल्या आगामी चित्रपटात प्रिया लेस्बियन महिलेची भूमिका साकारणार असून हा चित्रपट तिचा पहिला आंतरराष्ट्रीय सिनेमा असणार आहे. फादर लाईक या चित्रपटात प्रिया ही साराहची भूमिका साकारणार असून तिच्या लेस्बियन गर्लफ्रेंडची भूमिका अभिनेत्री गितीका विद्या ओहलान साकारणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान, “सिटी ऑफ ड्रिम्स’ या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री गीतिका त्यागी सोबत प्रिया रोमान्स करताना या सीनमध्ये दिसली. तिला ट्रोलही केलं जातंय. पण गुगलवर तिला तितकंच सर्चसुद्धा केलं जातंय. या सीरिजमध्ये प्रिया पूर्णिमा गायकवाड ही भूमिका साकारत आहे. नागेश कुकुनूर दिग्दर्शित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सीरिजला राजकारणाची पार्श्वभूमी आहे.
View this post on Instagram