मुंबई – आता गं बया’, ‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘दगडी चाळ’, ‘नीळकंठ मास्तर’ अशा अनेक मराठी चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री ‘पूजा सावंत’ने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पूजाने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं असून, आता पूजा परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. “महाराष्ट्राचा बेस्ट डान्सर’ या कार्यक्रमात ती परीक्षकाच्या खुर्चीत असेल. पूजाच्या नृत्यकौशल्यावर प्रेक्षक आधी पासूनच फिदा आहेत आणि आता स्पर्धकांच्या नृत्याचंच ती परीक्षण करणार आहे.
दरम्यान, आता पूजा परीक्षकाच्या भूमिकेत कशी दिसणार याकडे फॅन्सचे लक्ष लागले आहे. पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती आपल्या फॅन्स पर्यंत पोहचवत शेअर करत असते.
आपल्या उत्तम अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंतची आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणना होते.