छोट्या पडद्यावरील “भाभी जी घर पर हैं’ या मालिकेतील अनिता भाभीचा शोध आता पूर्ण झाला आहे. गेल्या 5 महिन्यांपासून गौरी खान या भूमिकेसाठी अभिनेत्रीच्या शोधात होती. या भूमिकेसाठी अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींची नावे चर्चेत होती. पण सौम्या टंडनच्या जागी मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेची वर्णी लागली आहे.
View this post on Instagram
या मालिकेसाठी दिग्दर्शक संजय कोहली यांनी प्रारंभी सौम्या टंडनला विचारणा केली होती. पण ती मालिका सोडून गेल्यानंतर निर्मात्यांनी मराठमोळ्या नेहा पेंडसेला विचारणा केली.
View this post on Instagram
सुरुवातीला नेहाने चक्क नकार दिला होता. त्यामुळे निर्मात्यांनी दुसऱ्या अभिनेत्रींचा शोध सुरू केला, पण 4 महिन्यांनी निर्मात्यांनी पुन्हा नेहाशी संपर्क केला तेव्हा तिने या प्रोजेक्टला होकार दिला.
View this post on Instagram
आता लवकरच नेहा शूटिंगला सुरुवात करेल. नेहा पेंडसेचा संजय कोहली यांच्यासोबतचा हा दुसरा प्रोजेक्ट आहे. या आधीही नेहाने “मे आय कम इन मॅडम’ या शोमध्ये लीड रोल केला होता. ही मालिकादेखील खूप गाजली होती.
View this post on Instagram