Prabhas In ‘Spirit’ | दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘कबीर सिंग’ आणि ‘ॲनिमल’ या दोन्ही चित्रपटांना मोठा प्रतिसाद मिळाला. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. या चित्रपटाच्या यशानंतर संदीप रेड्डी वंगा आणखी एक मोठा चित्रपट ‘स्पिरिट’ बनवण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटात प्रभास एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात एक मराठमोळी अभिनेत्री प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
‘स्पिरिट’ची टीम सध्या या चित्रपटासाठी प्री-प्रॉडक्शन आणि कास्टिंग करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा आणि निर्माते भूषण कुमार या ॲक्शन चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरशी चर्चा करत आहेत.
याशिवाय यात करीना कपूर खान आणि सैफ अली खान देखील दिसणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. या चित्रपटात दोघेही नकारात्मक भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. पहिल्यांदाच खऱ्या आयुष्यातले जोडपे एका हिंदी चित्रपटात निगेटिव्ह भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.
View this post on Instagram
या चित्रपटातही हर्षवर्धन रामेश्वर संगीत देत आहे, ज्याने ‘ॲनिमल’मध्ये संगीत दिले होते. ‘स्पिरिट’ची निर्मिती भद्रकाली पिक्चर्स आणि टी-सीरीज संयुक्तपणे करत आहे. ‘स्पिरिट’ 2026 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. याशिवाय संदीप रेड्डी वंगा रणबीर कपूरसोबत ‘ॲनिमल पार्क’ चित्रपटावर देखील काम करत आहेत.
हेही वाचा:
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का ; नगरसेवक रमेश पहेलवान पत्नीसह ‘आप’मध्ये सामील