‘हॅप्पी व्हॅलेन्टाईन डे’ म्हणत रोहित पवारांनी काढला मोदी सरकारला चिमटा

मुंबई – व्हॅलेन्टाईन डेनिमित्त सर्वत्र गुलाबी रंग चढला असताना, याच दिवशी राष्ट्रवादीचे तरुण नेते ‘रोहित पवार’ यांनी  ट्विटरच्या माध्यमातून ”व्हॅलेनटाईन डे’च्या शुभेच्छा दिल्या आहे. मात्र, यावेळी रोहित पवार यांनी केंद्र सरकारला चिमटा काढला आहे.

रोहित पवार म्हणाले कि, “हॅप्पी व्हॅलेन्टाईन डे! हा दिवस स्वच्छ व खऱ्या अर्थाने निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचा आहे. आज तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करणार असाल तर लक्षात असूद्या… गॅसचा दर ९१० रुपये प्रती सिलिंडर झालाय”. असं ते म्हणाले.

दरम्यान, इंडियन ऑईलने गॅस सिलिंडरच्या किंमतीत जवळपास १५० रुपयांची वाढ केली आहे. विना अनुदानित १४ किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत १४४.५० रुपयांपासून १४९ रुपयांपर्यंत वाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here