पुणे – काल रात्री (दि. १) आठच्या सुमारास कात्रज-बालाजीनगर येथील उड्डाणपूलावर एका चारचाकी वाहनाने पेट घेतल्याची घटना घडली. दरम्यान, ही घटना पाहताच पीएमआरडीए मारुंजी येथे कार्यरत असणारे जवान मयुर गोसावी यांनी तातडीने या आगीवर नियंत्रण मिळवत आपले कर्तव्य बजावले. तसेच पुणे अग्निशमन दलाशी संपर्क साधून मदत मागविली. या घटनेत कोणी जखमी नाही.
आग वेळीच विझवल्याने तेथे उपस्थित नागरिकांनी व कात्रज अग्निशमन केंद्रातील जवान यांनी मयुर गोसावी यांचे कौतुक केले. पीएमआरङीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनीदेखील याची दखल घेत गोसावी यांचे विषेश कौतुक केले.