मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे

राजभवनात ‘वाग्धारा सन्मान’ देण्यात आले

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे.मात्र त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने मुलांना प्राथमिक शिक्षण मराठीतून देण्याचा संकल्प केला पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.

मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साहित्य, संस्कृती आणि समाजसेवा या क्षेत्रांमधल्या मान्यवरांना राज्यपालांच्या हस्ते काल राजभवनात ‘वाग्धारा सन्मान’ देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह तसेच वाग्धाराचे अध्यक्ष वागीश सारस्वत उपस्थित होते.यावेळी राज्यपालांनी प्रसिद्ध हिंदी साहित्यिक डॉ.रामजी तिवारी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला.

तर अभिनेत्री शिखा मल्होत्रा यांना कोरोना काळात नर्स म्हणून केलेल्या कार्याबद्दल सन्मानित करण्यात आलं.पद्मश्री सिंधुताई सपकाळ आणि पंडित अजय पोहनकर यांच्या अनुपस्थितीत वाग्धारा पुरस्कार त्यांच्या वतीनं स्वीकारण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.