Marathi Movie Collection | Sangharsh Yoddha | Alyad Palyad : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेला संघर्ष आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे यांच्यावर आधारित ‘संघर्षयोद्धा’ नावाचा चित्रपट 14 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटाचा टीजर देखील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला असून, टीझरला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. सोशल मीडियावर देखील या टीझरची मोठी हवा झाली होती.
सिनेमात तुम्हाला छगन भुजबळ आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते, मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिका पाहायला मिळणार आहे. छगन भुजबळ यांची भूमिका अभिनेते संजय कुलकर्णी, तर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका शिवाजी दोलताडे यांनी साकारली आहे. तसेच, मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, आता या चित्रपटाची आकडेवारी समोर आली असून संघर्षयोद्धा सिनेमाने पहिल्या दिवशी 8 लाख रुपये, दुसऱ्या दिवशी 9 लाख रुपये, तिसऱ्या दिवशी 16 लाख रुपये, चौथ्या दिवशी 9 लाख रुपये, पाचव्या दिवशी 4 लाख रुपये, सहाव्या दिवशी 4 लाख रुपयांची कमाई केली आहे.
त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची जादू फार काही चालली नाही. एका आठवड्यात चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्राथमिक अंदाजानुसार, 53 लाखांच्या आसपास कमाई केली आहे.
तर दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर ‘अल्याड पल्याड’चा जोर असताना आजपासून ‘गाभ’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे आगामी काळात संघर्षयोद्धा सिनेमा मोठ्या पडद्यावर किती काळ तग धरून राहतो हे पाहणे महत्वाचे आहे.