मराठी माध्यमाच्या शाळा ही सामाजिक गरज

आ. मकरंद पाटील : भुईंज येथे विविध विकास कामांना प्रारंभ

वाई- मातृभाषेतून मिळणाऱ्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची समजून घेण्याची क्षमता वाढते. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा ही सामाजीक गरज आहे. जिल्हा परिषद शाळांच्या इमारती, भौतिक सुविधा दर्जेदार असण्याची त्यासाठी आवश्‍यकता आहे. ज्यामुळे गुणवत्ता वाढीस प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन आमदार मकरंद पाटील यांनी केले. चाहूर (भुईंज, ता. वाई) येथील विविध विकास कामांचा शुभारंभ शाळांच्या (क्रमांक 1 व 2) इमारत दुरूस्ती व नवीन वर्ग खोली बांधकामाचा प्रारंभ भुईंज ग्रामपंचायत सदस्य नारायण नलवडे, सौ. सुजाता भोसले, नंदकुमार खरे, शहनवाज मुलाणी, सौ. पूनम शिंदे, सौ. मंगल शेवते यांच्या हस्ते व आ. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी तालुका सूत गिरणीचे अध्यक्ष शशिकांत पिसाळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रतापराव पवार, पंचायत समिती सभापती सौ. रजनी भोसले, सदस्य विक्रांत डोंगरे, प्रमोद शिंदे, मधुकर भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. पाटील पुढे म्हणाले, दोन्ही चाहूर वस्त्यांतील शाळा इमारतींसाठी 4 लाख 91 हजार व 7 लाख 7 हजार रुपये वार्षिक कार्य योजना निधितून मंजूर झाले आहेत. हे काम विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधा वाढविणारे व्हावे. ते दर्जेदार पध्दतीने पूर्ण होण्यासाठी ग्रामस्थ, पालकांनी प्रयत्नशील रहावे.मुख्याध्यापक दिलीप बाबर यांनी इंग्रजी माध्यमातून आलेले विद्यार्थी व त्यांची गुणवत्ता त्यामुळे शाळेच्या पटसंख्येत झालेली वाढ नमूद केली.

प्रारंभी भिरडाचीवाडी नळ पाणी योजना (33 लाख), प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत दुरूस्ती (13 लाख), फुलेनगर रस्ता डांबरीकरण (7 लाख), अंगणवाडी इमारत दुरूस्ती (1लाख) या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
संदीप भोसले, सौ. सोनाली भोसले, राजूकाका भोसले, शशिकांत भोसले, सुधीर भोसले यांनी स्वागत केले. वसंतराव भोसले यांनी प्रास्ताविक केले. दिलीप बाबर यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष भोसले यांनी आभार मानले. दिलीप बाबर, शशिकांत पवार, सुजित जाधवराव, प्रकाश पावशे, प्रकाश इथापे, संपतराव वाघ, ज्ञानेश्‍वर महामुनी, संतोष बाबर, शंकर इथापे, ज्ञानोबा शिंगटे, राजेंद्र सोनावणे, अनिल चव्हाण, आत्माराम सोनावणे, सुधीर गायकवाड, मोहन चव्हाण उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.