आता अमेरिकेच्या निवडणूकीत मराठमोळा

रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराविरोधात प्रेस्टन कुलकर्णी मैदानात

वॉशिंग्टन- भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक प्रेस्टन कुलकर्णी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवत आहे. माजी सरकारी अधिकारी असणारे कुलकर्णी यांना डेमोकॅट्रिक पक्षाने तिकीट दिले आहे. कुलकर्णी हे राजकारणात येण्याआधी सरकारी अधिकारी म्हणून इराण आणि इस्रायलमध्ये नियुक्‍त होते.

प्रेस्टन कुलकर्णी हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवत आहे. कुलकर्णी हे त्यांच्या कूटनीती आणि एखादे काम निश्‍चयाने पूर्ण करुन घेण्याच्या गुणांसाठी ओळखले जातात. डेमोक्रेट्‌स पक्षाकडून भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. भारतीयांना महत्वाचे वाटणारे अनेक मुद्दे या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी वापरले जात आहे.

त्याचबरोबर भारतीय वंशाच्या लोकांना मतदार म्हणून आणि थेट प्रचारामध्ये सहभागी करुन घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच भारतीय वंशाचे उमेदवारही काही ठिकाणी देण्यात आले आहे. प्रेस्टन कुलकर्णी अशाच एका नावांपैकी एक आहे. टेक्‍साससारख्या मुख्य राज्यामधून कुलकर्णी निवडणूक लढवत आहेत.

41 वर्षीय कुलकर्णी रिपलब्लिकन उमेदावर ट्रॉय नेहल्सच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. कुलकर्णी यांनी निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यास टेक्‍सासमधून निवडूण जाणारे ते पहिले हिंदू प्रतिनिधी ठरतील.लोकसंख्येच्या दृष्टीने टेक्‍सास विविधतेने नटलेले राज्य आहे. येथील 64 टक्के नागरिक हे गौरवर्णीय, 25 टक्के लॅटीन अमेरिकन, 17 टक्के आशियन वंशाचे नागरिक तर 12 टक्के लोकं कृष्णवर्णीय आहेत. वेगवेगळ्या वंशाचे लोक राहत असल्याने आशियाई भाषांमधूनही जाहिराती केल्या जात आहे. कुलकर्णी यांनी आपली जाहिरात अनेक भाषांमध्ये केली आहे यामध्ये मराठीचा ही समावेश आहे.

सन 1969 मध्ये कुलकर्णी कुटुंब भारतातून अमेरिकेमध्ये गेले. तेथेच 1978 साली लुसियानामध्ये प्रेस्टन यांचा जन्म झाला. कुलकर्णी यांचे वडील व्यंकटेश कुलकर्णी भारतीय उपन्यासकार आणि शिक्षण तज्ज्ञ तर आई मार्गारेट या मूळच्या वेस्ट वर्जिनियाच्या आहेत. प्रेस्टन यांना लाभलेला राजकीय वारसा हा त्यांच्या आईकडून लाभल्याचे समजते.

कुलकर्णी यांची आई मार्गारेट यांचे पूर्वज 19व्या शतकामध्ये मॅक्‍सिकोमधून अमेरिकेत आले आणि त्यांनी टेक्‍सासमधील राजकारणामध्ये सक्रिय योगदान दिले होते. राजकीय वासरा असल्यानेचच प्रेस्टन यांच्या आई मार्गारेट या टेक्‍सासमध्ये दबदबा असणाऱ्या राजकीय व्यक्तीमत्वांपैकी एक आहेत. कुलकर्णी यांच्या निवडणुकीच्यासंदर्भातील वेबसाईटवरही मार्गारेट यांच्या राजकीय संघर्षाचे संदर्भ देण्यात आले आहेत.

कुलकर्णी यांना वयाच्या 18व्या वर्षीच टेक्‍सास विद्यापिठातील शिक्षण अर्ध्यात सोडावे लागले. कुलकर्णी यांच्या वडिलांना रक्ताचा कर्करोग असल्याचे निष्पण्ण झाल्याने त्यांना शिक्षण सोडावे लागले. वडिलांच्या मृत्यूनंतर प्रेस्टन यांनीच आपल्या तीन लहान भावंडांची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली. त्यानंतर कुलकर्णी यांनी हार्वर्ड विद्यापिठामधून लोकप्रशासन (पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन) विषयामध्ये पदवी मिळवली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.