मनसेच्या इशाऱ्याची दखल; ऍमेझॉन ऍपमध्ये मराठीचा समावेश

मुंबई – ऑनलाइन शॉपिंगसाठी देशात आघाडीवर असलेलया ऍमेझॉन ऍपमध्ये आता मराठी भाषेचा समावेश केला जाणार आहे. मनसेने दिलेल्या खळ्ळ खटॅकचा इशा-यानंतर ऍमेझॉन इंडियाने ही भूमिका घेतली आहे.

यूएसचे प्रतिनिधी आणि मनसे चिटणीस अखिल चित्रे यांच्यात बीकेसी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्स माध्यमातून बैठक झाली. त्यानंतर ऍमेझॉनने मराठी भाषेचा ऍपमध्ये समावेश करण्यास तयारी दर्शविली आहे. ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी मनसेच्या ई-मेलची दखल घेत 20 दिवसांमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यात येईल असे सांगितले.

मराठी भाषेचा ऍमेझॉन ऍपमध्ये समावेश करण्याबाबत मनसे नेते अखिल चित्रे यांनी पाठवलेल्या ई-मेलला कंपनीने उत्तर दिले होते. त्यानंतर एक बैठकीही झाल्या. या ईमेलचा स्क्रिन शॉट अखिल चित्रे यांनी त्यांच्या ट्‌विटर हॅंडलवर शेअर केला आहे. जेफ बेझोस आपला इमेल मिळाला आहे, ऍमेझॉन ऍपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला याची माहिती दिली आहे असे ऍमेझॉनच्या वतीने कार्तिक यांनी लिहिले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.