चिंबळी -चिंबळी फाटा (ता. खेड) येथील श्रीसमर्थ इंग्लिश मीडियम स्कूल ऍण्ड कॉलेजमध्ये मराठी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असल्याचे प्राचार्य अनिता टिळेकर यांनी सांगितले.
मराठी गौरव दिनानिमित्त श्रीसमर्थ स्कूल ऍन्ड कॉलेजमध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे, सचिव विद्या गवारे यांच्या अध्यक्षतेखाली सरस्वती माता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर पहिले ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची कथाकथन, हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी शिवाजी गवारे यांनी मराठी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मराठा भाषेचे महत्त्व समजावून सांगितले, तर हस्ताक्षर स्पर्धेत वैष्णवी मिकोडे, ईश्वरी आल्हाट, सुज्ञका नायकोडी, अप्रिता मुंडे, रिया यादव या विद्यार्थ्यांनी सहभागी घेत यश संपादन केले.
या सर्व विद्यार्थ्यांचे व वर्ग शिक्षक सूरज सोमवंशी, मीनाक्षी पाटील, शीतल बोरसे, प्रियंका साळवे, स्नेहा साळुंखे, राजश्री बटवाल, अक्षदा नलगे, भाग्यश्री कांबळे, मनीषा गोरडे या शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी सर्व शिक्षक, विद्यार्थी
उपस्थित होते.