मराठी सेलिब्रिटींनी केले उस्फुर्तपणे मतदान

पुणे –  लोकसभा निवडणूक प्रक्रिया देशभरात सुरू असून तिसऱ्या टप्प्यासाठी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहे. यावेळी मराठी सेलिब्रिटींनीही उस्फुर्तपणे मतदान केले.

अभिनेते सुबोध भावे यांनीही बुधवार पेठ येथील नूतन समर्थ मतदान केंद्र येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. फर्जंद चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, प्रवीण तरडे, सलील कुलकर्णी, अमेय वाघ आणि अभिनेत्री गायत्री दातार हिनेही पुण्यामध्ये मतदान केले आहे. यावेळी सेलिब्रिटींनी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.