मुंबई – भांडण, प्रेम, द्वेष आणि स्पर्धा या सगळ्यांचं मिश्रण असलेला सर्वांचा लाडका रिएलिटी शो पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
अभिनेता सुयश टिळक –
आणि तो शो आहे आपला मराठी “बिग बॉस”. पहिल्या दोन पर्वांच्या घवघवीत यशानंतर आता बिग बॉस मराठीचा तिसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
अभिनेत्री नेहा खान –
काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस 3’ चा टिझर कलर्स मराठी चॅनलच्या ऑफिशल इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला होता.
अभिनेता चिन्मय उदगीरकर –
तसेच, या टिझर खाली “पुन्हा होणार कल्ला, पुन्हा होणार राडे आणि सदस्यांसोबत रंगणार खेळ दर्जेदार, कारण पुन्हा दिमाखात उघडणार बिगबॉसच्या घराचं दार’ असं कॅप्शन सुद्धा देण्यात आलं.
अभिनेत्री केतकी चितळे –
त्यामुळे यंदाच्या तिसऱ्या सीझनमध्ये कोण कोण स्पर्धक सहभागी होणार, यंदाची थीम काय असेल, काय नवीन पाहायला मिळणार अशा अनेक प्रश्नांबाबत रसिकांच्या मनात उत्सुकता वाढली आहे.
अभिनेत्री अक्षया देवधर –
दरम्यान, मिळालेल्या माहिती नुसार यंदाच्या सीजन मध्ये कोणकोणते सेलिब्रिटीज सहभागी होणार याची माहिती प्रसारित करण्यात आली आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबाबत माहिती दिली आहे.
अभिनेता संग्राम समेळ –
‘देवमाणूस’ मालिकेतील एसीपी दिव्या सिंहच्या भूमिकेने लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली अभिनेत्री नेहा खानपासून ‘अग्गंबाई सासूबाई’मुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री तेजश्री प्रधान यांची नावं सध्या चर्चेत आहेत.
अभिनेता ऋषी सक्सेना –
तसेच, ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील पाठकबाई अर्थात अंजलीच्या भूमिकेमुळे अक्षया देवधर बिग बॉसच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अभिनेत्री तेजश्री प्रधान –
तर दुसरी कडे “काहे दिया परदेस’ मालिकेतील शिव. अर्थात अभिनेता ऋषी सक्सेना बिग बॉसच्या घरात दिसणार असं सुद्धा बोललं जात आहे.
अभिनेत्री पल्लवी पाटील –
दरम्यान या सर्वांमध्ये एक चेहरा पूर्वी प्रमाणेच झळकणार आहे तो म्हणजे दिग्गज अभिनेते-निर्माते ‘महेश मांजरेकर’ मांजरेकरांच्या स्टाईलचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे पुढील सिझनची सूत्रंही मांजरेकरांच्याच हाती सोपवली जाणार आहेत.
मांजरेकरांकडेच पुन्हा सूत्रसंचालन –