पुणे: देश-विदेश, राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन, आणि क्रीडा जगतातील आज दिवसभरामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर! पहा दैनिक प्रभातचे आजचे स्मार्ट बुलेटिन…
1. निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंहची फाशी निश्चित
सर्वोच्च न्यायालयाने मुकेश सिंहची याचिका फेटाळली
2. भविष्यातील अर्थव्यवस्थेविषयी मोदी सरकार अनभिज्ञ
अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची टीका
3. प्रवाशांना बोर्डिंग गेटपर्यंत घेऊन जाणे विमान कंपनीची जबाबदारी नाही
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाने विमान कंपन्यांना दिलासा
4. त्या जागेचं नाव सांगा जिथे गोळ्या घालणार त्याठिकाणी येतो
असदुद्दीन ओवेसींचे अनुराग ठाकुर यांना आव्हान
5. अर्णब गोस्वामी यांच्याशी गैरवर्तन कुमार कामराला पडले महागात
इंडिगो सहा महिने तर एअर इंडियाकडून अनिश्चित काळासाठी बंदी
6. काही करून आम्हाला वाचवा चीनमधील भारतीय विद्यार्थ्यांचा टाहो
अन्न पाणी संपत आल्याने भारतीय विद्यार्थ्यांची चीनमध्ये सरकारकडे मदतीची याचना
7. भीमा-कोरेगाव हिंसाचार पुर्वनियोजित कट होता
राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक यांचा आरोप
8. काळोखात पाप करू नका, काय असेल ते उजेडात करा
भीमा-कोरेगाव प्रकरणावरून शिवसेनेचा केंद्र सरकारला लगावला टोला
9. सीएए, एनआरसी विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे भारत बंदची हाक
बंदला साथ देणार नसल्याची व्यापाऱ्यांचा माहिती
10. बॅडमिंटनपटू सायना नेहवालची राजकीय कारकिर्दीला सुरुवात
योगेश्वर दत्तर, बबिता फोगट पाठोपाठ सायनाचा देखील भाजपात प्रवेश