जामियाबाहेर गोळीबार करणाऱ्याने घेतले 10 हजारात पिस्तूल

नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाबाहेर गोळीबार करणाऱ्या तरूणाने देशी बनावटीचे पिस्तूल दहा हजार रुपयांना खरेदी केले होते, अशी माहिती पोलिसांना दिली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये त्याच्या गावाशेजारील जेवार गावात राहणाऱ्याकडून हे पिस्तूल त्याने घेतले. भावाच्या लग्नात गोळी उडवायची असल्याचे सांगून हे एकच गोळी मारता येणारे पिस्तूल घेतले होते, असे त्याने पोलिसांना सांगितले आहे.

या विक्रत्याने त्याला आणखी दोन गोळ्या दिल्या होत्या. या विक्रेत्याची ओळख पटली नसली तरी त्याच्याशी ओळख करून घेणाऱ्या तरूणाला पोलिसांनी ओळखले आहे.

शाळेत जायचे म्हणून हा तरूण त्या दिवशी घरातून बाहेर पडला. तेथून तो बसने रवाना झाला. दिल्लीत उतरल्यावर त्याने रिक्षाने जामिया गाठले,असे त्याच्या पालकांनी पोलिसांना सांगितले आहे. घराबाहेर पडण्यापुर्वी हा तरूण तिच्या बहिणीला म्हणाला होता, तुला माझा अभिमान वाटतो? आज पासून वाटायला लागेल, असे वृत्त हिंदुस्तान टाईमसने दिले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.