रस्त्यावरील खड्ड्यांची अवस्था पाहून मराठी कलाकार संतापले

मुंबई- शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली असून, रस्त्यांवरील खड्डे नागरिकांच्या जीवावर बेतू लागले आहेत. सध्या चाळण झालेल्या रस्त्यांवरून वाट काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागतेय. या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सामान्य जनतेबरोबरच मराठी कलाकारांनाही या खड्यांच्या त्रास होतोय. मराठी अभिनेता ‘सुबोध भावे’ आणि जितेंद्र जोशी’ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रस्त्यांची सध्याची परिस्थिती कथन केली आहे.

‘रस्त्यांवरील खड्डे, बेशिस्तपणा आणि वाहतूकीचे नियम न पाळणारे हे छुपे दहशतवादी आहेत. त्यांच्यापासून सावध राहा.’ असा टोला सुबोध भावेनं लगावला आहे. तर, हे जग एक खूप मोठ्ठा खड्डा असून तो भरुन काढण्यासाठी जो करा भरावा लागेल त्यासाठी माणसाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. अशा मिश्किल शब्दात जितेंद्र जोशीनं मत मांडलं आहे. दरम्यान, त्यांच्या या पोस्टला नेटकऱ्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.