मुंबई – मराठीतील दिग्ग्ज अभिनेते सचिन पिळगावकर यांची कन्या श्रिया पिळगावकरने अतंत्य कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर आलेल्या ‘मिर्झापूर’ या वेबसीरिज मधील श्रियाच्या अभिनयला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. सर्वच स्तरातून तिचे चांगले कौतुक देखील करण्यात आले होते.
दरम्यान, नुकतंच श्रियाने इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले असून, आपल्या आगामी ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाची माहिती दिली आहे. श्रियाने फोटो शेअर करत लिहिले की, हाथी मेरे साथी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. या चित्रपटाचा भाग बनून मी स्वतःला खूप नशीबवान मानते. असं तिने म्हंटल आहे. ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट तीन भाषेत प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
? Styled by @shreejarajgopal HMU @kajol_mulani In @salitananda Pc @saurabhdalvi_photography