मराठवाड्यात मराठा समाज सर्वाधिक मागास 

आरक्षणासमर्थन करणाऱ्या याचिकाकर्त्यांचा दावा

मुंबई  – मराठवाड्यातील मराठा समाज हा सर्वाधिक मागसलेला आहे. मागास प्रवर्ग आयोगाने तयार केलेला अहवाल आणि शिफारशी योग्य असल्याचा असा दावा ऍड. प्रसाद ढाकेफाळकर यांनी आज उच्च न्यायालयात केला.

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या आणि आरक्षणाला समर्थन देणाऱ्या याचिकांवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. यावेळी राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या समर्थनार्थ प्रदीप पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ऍड. प्रसाद ढाकेफाळकर यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाचा लेखाजोगा न्यायालयात मांडला.

या भागातील मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात मागास आहे, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. सुशिक्षीत मराठा समाजातील तरूण मोठ्या प्रमाणात बरोजगार आहेत. त्यांना योग्यती संधी उपलब्ध न झाल्याने मिळेल ते काम करावे लागते. सुशिक्षीत तरूणही उस तोडणी कामगार म्हणून वावरत असल्याचा दावा करताना आयोगाने मराठा समाजाचा केलेल्या सर्व्हेक्षणाचे समर्थन केले.

आयोगाने योग्य प्रकारे सर्व्हे करून मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्‌या मागास असल्याचा काढलेला निर्ष्कष आणि शिफारशी योग्य आहे. तसेच राज्य सरकारनेही या अहवालातील शिफारशी स्विकारून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्‌या मागास या वर्गात केलेला समावेश हा सद्यस्थितीनुसार केलेला आहे. या समाजाला आज आरक्षणाची गरज आहे, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. आजही सुनावणी अपूर्ण राहिल्याने उद्या मंगळवार दि. 19 मार्चला सुनावणी होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here