प्रा. नामदेव जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

मराठा सन्मान मोर्चातर्फे पिंपरी पोलिसांना निवेदन

पिंपरी -मराठा आरक्षणाबाबत खोटी अफवा पसरवणाऱ्या प्रा. नामदेव जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी मराठा सन्मान मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. गुरुवारी पिंपरी पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी मराठा सन्मान मोर्चाचे समन्वयक कुणाल साठे, प्रीतम मेटे. अभिजीत शिंदे, यशवंत कर्डीले, जितेंद्र सातव, रोहित भालके, युवराज पाटील, निखिल भालके, निलेश चासकर आदी उपस्थित होते. सोशल मीडियावर मागील दोन ते तीन दिवसांपासून प्रा. नामदेव जाधव यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी मराठा आरक्षण रद्द करण्यात आले आहे. असे चुकीचे विधान केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.

जाधव हे वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे काम करत असून केवळ राजकीय पोळी भाजण्याच्या हेतूने खोटी अफवा पसरवून उच्च न्यायालयाचा अपमान व मराठा समाजाची फसवणूक केल्याचे निवेदनात म्हटले आहे. याबाबत वरिष्ठ निरीक्षक शंकर बाबर म्हणाले, चौकशी सुरु आहे. मराठा सन्मान मोर्चाने दिलेल्या व्हिडिओची खातरजमा करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.