जालना : अंतरवाली सराटीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे. सलाईन लावून उपोषण आवडत नाही म्हणत त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. ते आता उपाचारासाठी रुग्णालयात दाखल होणार आहेत. नवव्या दिवशी त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला, त्यांच्या आंदोलनानंतर अखेर सरकारनं मराठा समाजला स्वतंत्र आरक्षण दिलं, मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील अद्यापही ठाम आहेत. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं होतं.
उपोषणाच्या आठव्या दिवशी सोमवारी त्यांची तब्येत खालावली. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे, मात्र नवव्या दिवशी त्यांनी मोठी घोषणा केली. आपण उपोषण स्थगित करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सलाईन लावून मला उपोषण आवडत नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आता ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणार आहेत.