जालना : मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत, हे त्यांचं सहावं उपोषण असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. यावेळी त्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
येत्या दोन चार दिवसात आमचा विषय संपवा सगे सोयरे शब्दाची तात्काळ अमंबजावणी करा. नसता 2024 ला आमच्या नावानं ओरडत बसायचं नाही. फडणवीसांचे सगळे गणितं फेल करून टाकू असा इशारा यावेळी जरांगे पाटील यांनी दिला आहे.आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
ओबीसीकडूनदेखील उपोषण सुरु
एकीकडे मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरु आहे. तर दुसरीकडे ओबीसी बांधवांकडूनही अंतरवालीत उपोषणाला सुरुवात करण्यात आलीय. गनिमी काव्यानं अंतरवालीत जात शिंगारे वस्तीत मंगेश सासनेंसह सहा जण उपोषणाला बसले आहेत. सगे सोयरे शब्दाची अंमलबजावणी होऊ नये अशी मागणी ओबीसी बांधवांनी केलीय. ओबीसींनी सुरू केलेल्या उपोषणामुळे मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.