केंद्राने घटनेत दुरुस्ती केली तर मराठा आरक्षण शक्य !- शरद पवार

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरातील दसरा चौकातील मराठा समाजाच्या आंदोलनाला भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. मुख्यमंत्र्यांनी विलंब न करता आरक्षण जाहीर करावे अशी मागणी त्यांनी केली.

शरद पवार म्हणाले, “मी आंदोलकांना आवाहन करू इच्छितो की आंदोलनाला गालबोट लागेल असे काहीही करू नका. प्रत्येकाच्या भावना महत्त्वाच्या आहेत. पण राज्य सरकारच्या नाकर्तेपणाची किंमत सामान्य लोकांना मोजावी लागू नये, याची काळजी आंदोलकांनी घेणे गरजेचे आहे.”
सरकार म्हणते की मराठा समाजाला आरक्षण देण्यास कायदेशीर अडचणी आहेत. पण कायदेशीर अडचणीतूनही मार्ग काढता येतो. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. केेंद्राने घटनेत थोडी दुरुस्ती करण्याची भूमिका घेतली आणि प्रस्ताव संसदेत मांडला तर हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो.
गेल्या चार वर्षांत आरक्षणाबाबत काहीच हालचाल न झाल्याने तरुणांच्या मनात एक अस्वस्थता निर्माण झाली आणि त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला, असे मला वाटते. महाराष्ट्रात सध्या एक अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे, जे राज्याच्या हिताचे नाही. असेही पवार यांनी स्पष्ट केले.
पवार पुढे म्हणाले, “मराठा समाजातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी शांतीपूर्ण आणि संयमित मार्गाने काढण्यात आलेल्या मोर्चांची जगभरातील वृत्तपत्रांनी दखल घेतली. या मोर्चांचं जगभरात कौतुक होत असताना राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी मात्र फक्त आश्वासने दिली.”

https://twitter.com/PawarSpeaks/status/1023117496646361088

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)