कोल्हापूर- काय तर पदरात पडतंय ते घ्या, असं म्हणणाऱ्यांनी ईडब्लएस आरक्षणामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला फटका बसणार नाही, असे लिहून द्यावे, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलाय. ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या पाटगाव इथं सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित मराठा आरक्षण संघर्ष यात्रेत बोलत होते. दरम्यान, यावर्षी तात्पुरते इडब्लू आरक्षण मागणारे पुढच्या वर्षीची जबादारी कोण घेणार? असा सवाल करत मराठा नेत्यांना सज्जड दम दिलाय.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या पाटगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षण संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं यासाठी मराठा समाजाचे नेते खासदार संभाजीराजे छत्रपती यांना विशेष निमंत्रित करण्यात आलं होतं यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी सकल मराठा समाजातील नेत्यांना आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या भूमिका याबाबत चांगलेच खडसावले आहे तसेच मराठा समाजाला नेत्यांना विद्यार्थ्यांना आत्म हत्या न करण्याची शपथ देखील त्यांनी यावेळी समस्त उपस्थित समुदायाला दिली आहे.
इडब्लू आरक्षण आरक्षण नको हे केवळ संभाजीराजे यांची भूमिका नाही, ही भूमिका सकल मराठा समाजाची आहे. मराठा आरक्षणाला विरोध करायचा असेल तर,केवळ संभाजीराजेला विरोध करू नका, विरोध करायचा असेल तर सकल मराठा समाजाला करा,असं जाहीर आवाहन खा. संभाजीराजे यांनी केलंय.