Maratha reservation : कोल्हापूरात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक

मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पुतळा जाळण्यावरून पोलीस आणि आंदोलकांची जोरदार झटापट

कोल्हापूर (प्रतिनिधी) – मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरू असणाऱ्या कोल्हापुरातल्या ठिय्या आंदोलनादरम्यान आज मराठा आंदोलन चांगलेच आक्रमक झाले आहे. मराठा समाजाच्या विरोधात वक्तव्य ( Maratha reservation ) करणाऱ्या मंत्री विजय वडेट्टीवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न या आंदोलकांनी केलाय. 

यावेळी मराठा आंदोलन आणि पोलिसांची जोरदार धक्काबुक्की करत झटापटही झाली आहे. आरक्षण आणि लवकर भरतीच्या प्रकरणावरून मराठा समाजाचा राज्य सरकारवर रोष असताना कोल्हापुरातल्या दसरा चौकातील घटना घडली आहे. 

यावेळी आंदोलकांच्या ताब्यातून मंत्री वडेट्टीवार यांचा पुतळा काढून ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना प्रचंड बळाचा वापर करावा लागला आहे. यावेळी आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा च्या घोषणा तसेच राज्य सरकारच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.