‘यूपीएससीच्या तयारीसाठी मराठा समाजातील तरुणांना दिल्लीत पाठविणार’

मुंबई – केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीकरिता (UPSC) मराठा समाजातील 225 तरूणांना सरकार दिल्लीला पाठवणार आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मान विकास संस्थेच्या (सारथी) वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मराठा समाजातील 225 तरुणांना दिल्लीतील खासगी शिकवणी वर्गात पाठविण्यात येणार आहे. या तरुणांच्या प्रशिक्षण शुल्कासह शिकवणी काळात दरमहा 13 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंगळवारी झाली. यावेळी सेट, नेट परीक्षा तसेच न्यायाधीश पदाच्या पूर्वतयारीसाठी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री तथा मराठा मोर्चाच्या मागण्यांच्या अनुषंगाने विविध निर्णयाच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.