मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: मराठा आरक्षणा संदर्भात मराठा समाजाने राज्यभर आंदोलने सुरु केल्याने राज्यसरकार चांगलेच गोत्यात आले आहे. चार वर्षांपूर्वी मराठा समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने मराठा आरक्षणा संदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप राज्यभरातील मराठा समाजाकडून भाजपावर होत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणा संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेतली होती. “मागासवर्गीय आयोगास लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची विनंती करण्यावर सत्ताधारी व विरोधकांचे एकमत झाले आहे” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कामध्ये मिळणाऱ्या सवलतींना जर कॉलेज प्रशासनाकडून अडथळा निर्माण करण्यात येत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
“राज्यसरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठीच्या होस्टेल्ससाठी जमीन अधिग्रहण करण्यास सुरुवात केली आहे मात्र तोपर्यंत समाजकल्याण विभागाकडे असलेल्या रिकाम्या इमारती होस्टेल्स म्हणून उपलब्ध करून देण्यात येतील तसेच  अण्णासाहेब पाटील कर्जयोजने संदर्भात येणाऱ्या अडचणींचा पाठपुरवढा राज्यसरकार करत आहे” अशी माहिती त्यांनी दिली.
मराठा समाजाचे मूक मोर्चे हे देशभरामध्ये आदर्श मानले जातात त्यामुळे मराठा समाजाच्या प्रतिमेस धक्का लागेल असे कोणतेही अनुचित प्रकार मराठा समाजातील तरुणांनी घडू देऊ नये असे आवाहन देखील त्यांनी यावेळेस केले.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1023173345376788480

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)