मुंबई बंद : ठाण्यात आंदोलकांकडून रेलरोको करण्याचा प्रयत्न

मुंबई मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलन तीव्र झाले असून मराठा क्रांती मोर्चाने आज मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड येथे बंदची हाक दिली आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून शांतेतत आंदोलन करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने केले आहे. तरीही ठाण्यात बंदला हिंसक वळण लागले आहे. सकाळी ठाण्यातील वागळे इस्टेट येथे आंदोलकांनी टीएमटीच्या बसची तोडफोड केली. तर घणसोली नवी मुंबई येथे पहाटे दोन बेस्ट बसवर दगडफेक झाल्यामुळे ऐरोली ते वाशीपर्यंत बेस्टची बससेवा बंद ठेवली आहे. ठाण्यातील माजीवाडा येथे रस्त्यावर टायर जाळून वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवाय जोगेश्वरीजवळ व ठाणे लोकल रेल्वे स्थानकावरही आंदोलकांकडून रेलरोकोचा प्रयत्न करण्यात आला.

वेस्टर्न एक्स्प्रेस-वेवर मराठा संघटनांने ठिय्या आंदोलन केल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील काही शाळांनी सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबईत अतिरिक्त पोलीस फोर्स तैनात करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)