मराठा आंदोलन : राज्यातील एसटी वाहतूक ठप्प

56 आगारांतून एकही बस सुटली नाही, 194 आगार अंशत: बंद

पुणे – गेल्या तीन दिवसांपासून मराठा समाजाचे राज्यभरात आंदोलन सुरू आहे. अनेक जिल्ह्यांत रास्ता रोको करण्यात येत असून काही भागांत दगडफेक करण्यात आली. याचा मोठा फटका एसटी वाहतुकीला बसला आहे. राज्यातील 250 पैकी 56 आगारांमधून बुधवारी एकही बस सुटू शकली नाही. तर, 194 आगारांतून अंशतः वाहतूक झाली. यामुळे तब्बल साडेपाच हजार फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाने आंदोलन तीव्र केले आहे. याचा परिणाम बुधवारीही दिसून आला. मुंबई, ठाणे, पनवेल, सातारा आणि रायगड या जिल्ह्यांत बंद होता. यामुळे सकाळपासूनच राज्यभरातून या जिल्ह्यांकडे जाणाऱ्या एसटीवर परिणाम झाला. पुणे-मुंबई महामार्गावर चक्‍काजाम आंदोलनामुळे आणि सातारा, बारामती, कोल्हापूर, बीड, लातूर मार्गावरील सेवा सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली. मात्र, जसजशी परिस्थिती नियंत्रणात येईल, त्यानुसार कोल्हापूर, सांगलीकडे बसेस सोडण्यात आल्या. तर सोलापूर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वाहतूक गेल्या दोन दिवसापासून ठप्प असून एकही बस सोडण्यात आली नाही.

बुधवारी राज्यभरातून एसटीच्या 14 हजार 550 फेऱ्यांचे नियोजन होते. मात्र, वाहतूक बंद केल्याने प्रत्यक्षात 8 हजार 969 फेऱ्या होऊ शकल्या.

एसटीचे लाखोंचे नुकसान

गेल्या दोन दिवसांत राज्यातील विविध भागात काही बसेसवर दगडफेक झाली. तर, बुधवारी एका बसवर दगडफेक झाल्याची नोंद महामंडळाकडे करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे गेल्या दोन दिवसांत बसची तोडफोड, फेऱ्या रद्द आणि पूर्णत: आगार बंद यामुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

विभाग एकूण आगारांची संख्या नियोजित फेऱ्या प्रत्यक्ष सुटलेल्या फेऱ्या अंशतः बंद आगार पूर्ण बंद आगार


1) औरंगाबाद विभाग  47 2,687 683 26 21


2) मुंबई विभाग  45 2,912 2,330 40 05


3) पुणे विभाग  55 2,155 1,543 46 09


3) नागपूर विभाग  26 1,603 1, 518 26 00


4) नाशिक विभाग  44 3,667 1, 810 23 21


5) अमरावती विभाग  33 1,526 1, 085 33 00

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)