एसटीला पाच दिवसात 35 कोटींचा फटका

मराठा आरक्षण आंदोलन : मराठवाडा, विदर्भातील बस फेऱ्यांचे नुकसान

पिंपरी – मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरीता राज्याच्या विविध भागात महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसेस फोडण्यात आल्या असून याचा मोठा फटका महाराष्ट्र परिवहन महामंडळाला बसला आहे. गेल्या पाच दिवसात एसटीला सुमारे 35 कोटींचा फटका बसला आहे. गेल्या पाच दिवसात राज्यातील विविध भागात 174 बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. तोडफोड झालेल्या बसेसमुळे सुमारे 60 लाखाचे नुकसान झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मराठवाडा आणि विदर्भ या विभागामध्ये धावणाऱ्या बसेसचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पंढरपूर यात्रेकरीता सुमारे 4 हजार एसटी बसेसच्या फेऱ्या झाल्या असून 90 टक्के वारकरी आपल्या घरी सुखरुप पोचले आहेत. पंढरपुरच्या यात्रेला गेलेल्या वारकऱ्यांना काही त्रास होणार नाही, अशी आंदोलनकर्त्याकडून ग्वाही मिळाली असल्याने पंढरपूर यात्रेवर जास्त काही परिणाम झाला नाही. पंढरपूर यात्रेकरिता गेलेल्या गाड्यांना स्पीकर बसवले असल्याने आंदोलनकर्ते बसेसला अडवत नाहीत, अशी माहिती मिळाली आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात बसेसचे तोडफोडीचे प्रमाण कमी झाले असून एसटीचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलेल्या आवाहनाला आंदोलकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

कुठलेही आंदोलन असले तरी सर्वसामान्यांची जीवन वाहिनी असलेल्या एसटीला लक्ष्य केले जाते. एसटीचा कसलाही संबंध नसताना एसटीचे नेहमी नुकसान केले जाते. जनसामान्यांचे हक्काचे प्रवासाचे साधन म्हणजे एसटी आहे. सरकारवरचा राग एसटीवर काढून काय साध्य होणार? आंदोलकांनी जनसामान्यांच्या जीवन वाहिनीवर दगडफेक करु नये.
– दिवाकर रावते, परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)