मार्केटयार्ड आज बंद

पुणे – सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी करण्यात येत असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मार्केटयार्ड येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशन आणि कामगार युनियनच्या वतीने सोमवारी (दि.30) बंदचे आवाहन केले आहे.

संपूर्ण राज्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास आडते आणि कामगारांनी एकमताने पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे सोमवारी मार्केटयार्ड बंदचे आवाहन केल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ आणि कामगार युनियनचे अध्यक्ष अमोल चव्हाण आणि सचिव संतोष नांगरे यांनी सांगितले. त्यानुसार तरकारी, फळे, कांदा-बटाटा आणि केळी बाजार बंद राहणार आहे. ग्राहकांनी खरेदीस येऊ नये, शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस आणू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आलेले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)