दंतेवाडा – छत्तीसगड मधील दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत एक कट्टर नक्षलवादी नेता ठार झाला. गुड्डी असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. गेल्या एप्रिल महिन्यात भाजपचे आमदार भीमा मंडावी यांची हत्या झाली होती. त्या हत्येचा गुड्डी हा सूत्रधार होता.
हिरोली जंगलात ही चकमक झाली. चकमकीत गुड्डी ठार झाल्यानंतर त्याचे अन्य साथीदार त्याचा मृतदेह तेथेच सोडून पलायन केले. ठार झालेल्या या नक्षली नेत्याचा किमान 40 मोठ्या हिंसक प्रकारात हात होता. त्याला पकडून देण्यासाठी एक लाख रूपयांचे बक्षिस पोलिसांनी लावले होते.