पिंपरी -शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतरही पिंपरी-चिंचवड शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आपले अस्तित्व कायम राखत नविन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश घडवून आणण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरीतील अनेकांनी प्रवेश केल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे.
मुंबईत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी युवासेना सचिव वरुण देसाई, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर या प्रमुखांसह पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन आहेर, शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले, उपजिल्हा प्रमुख रोमी संधु, भोसरी विधानसभा संपर्कप्रमुख केसरीनाथ पाटील हे उपस्थित होते.
राजपूत समाजाचे पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष प्रवीण राजपूत, सोशल मीडिया प्रमुख गणेशसिंह राजपूत, विभाग प्रमुख राजेंद्रसिंह राठोड, विभाग प्रमुख विक्रम सिंह बायस, सदस्य कुणाल राजपूत यांच्यासह शेकडो सभासद, दापोडी येथील सामाजिक कार्यकर्त्या जन्नत सय्यद यांनी महिला कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
ऍड. सचिन भोसले यांनी सर्वांचे स्वागत केले. शिवसेनेत ताकतीचे नेते व कार्यकर्ते प्रवेश करत असून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटास मोठे यश मिळेल, असा आत्मविश्वासही भोसले यांनी व्यक्त केला.